मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : गुरूवार, 17 जानेवारी 2019 (18:34 IST)

पुणे एक्स्प्रेस वेवरील वाहतूक उद्या दोन तासासाठी बंद

मुंबई- पुणे एक्स्प्रेस वेवरील रसायनीजवळ ओव्हरहेड गँट्रीज बसवण्यात येण्यार आहे. त्यामुळे उद्या दुपारी १२ ते दोन या कालावधीमध्ये एक्स्प्रेस वेवरील वाहतूक बंद राहणार आहे. त्यामुळे दुपारच्या वेळी एक्स्प्रेस वेवर वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. प्रवाशांना त्रास होऊ नये तसंच त्यांची गैरसोय होऊ नये यासाठी एक्स्प्रेस वेवरील वाहतूक या जुन्या महामार्गावर वळवण्यात येणार आहे.
 
या आधी १० जानेवारीला देखील मुंबई – पुणे एक्स्प्रेस वे वरील वाहतूक दोन तास बंद ठेवण्यात आली होती. रसायनी आणि माडप याठिकाणी ओव्हरहेड गँट्रीजचे काम करण्यात आले होते. त्यासाठी वाहतुक दुपारी १२ ते २ या कालावधीत बंद ठेवण्यात आली होती. त्यावेळी देखील वाहतूक कोंडी होऊ नये तसंच प्रवाशांना त्रास होऊ नये यासाठी जुन्या मार्गावर वाहतूक वळवण्यात आली होती.